ट्रेनला होणारा उशीर आणि लागोपाठ प्रवाशांच्या येणा-या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढते. थंडीच्या दिवसात तर धुक्यामुळे ट्रेनला होणा-या उशीराचा अंदाजही घेता येत नाही. गर्दी झाल्याने स्टेशनवरही अडचण होते. पण आता या समस्येचं निरसन रेल्वेकडून केलं जाणार आहे. रेल्वे तुम्हाला गाडीचं लाईव्ह स्टेटस तुमच्या व्हॉट्सॲपवर देणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या गाडीचं लाईव्ह स्टेट्स बघू शकणार आहात. म्हणजे यापुढे गाडीची माहिती विचारण्यासाठी तुम्हाला आता 139 नंबरवर फोन करण्याची गरज पडणार नाही. आत्तापर्यंत ट्रेनच्या लाईव्ह स्टेट्स जाणून घेण्यासाठी एकतर चौकशी कक्षात फोन लावावा लागत होता नाहीतर इंटरनेटवर पीएनआरच्या माध्यमातून माहिती घ्यावी लागत होती. पण वेबसाईट्सवर अनेकदा अपडेटेड माहिती नसते. अशात तुम्हाला आता त्रास करून घेण्याची गरज नाहीये. कारण तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपचा वापर करून ट्रेनची ताजी माहिती माहिती मिळवता येईल.
व्हॉट्सॲपवर ट्रेनची ताजी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ ट्रेनचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही वेळातच ट्रेनशी निगडीत माहिती तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमच्या फोनवरून 7349389104 हा नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर तुम्ही त्या नावाने सेव्ह करावं लागेल, जेथून ट्रेन निघणार असेल. त्यानंतर कोणत्याही ट्रेनचा नंबर या नंबरवर पाठवून माहिती मिळवू शकता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews